आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना राजभवनावर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही अनोख्या पध्दतीने राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय राऊत यांनी ट्विट करत राज्यपाल कोश्यारींना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांचे ट्विट नेहमीच चर्चेत असते. आपल्या खास शैलीमध्ये किंवा शेरोशायरीमध्ये ते ट्विट करत असतात. राज्यपालांना शुभेच्छा देतानाही त्यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. आज राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना 12 आमदारांच्या यादीची आठवण करुन दिली आहे. यामुळे राऊतांच्या ट्विटची सगळीकडे चर्चा आहे.
'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!' असे ट्विट राऊतांनी केले आहे.
दरम्यान राज्यभरातून कोश्यारींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून राज्यपालांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.