आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनावर निशाणा:वेडे लोकं बरळत असतात, ते नेमक्या कोणत्या नशेत बरळत असतात याचा तपास NCB ने करावा -संजय राऊत

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होती असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तसेच देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 ला मिळाले असल्याचे म्हणत तिने मोदी सरकारवर स्तुती सुमने उधळली होती. यानंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली. यानंतर तिने पुन्हा एकदा महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन संजय राऊतांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. वेडे लोकं बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा तपास एनसीबीने करावा असा निशाणा राऊतांनी साधला आहे.

संजय राऊत अभिनेत्री कंगनाविषयी बोलताना म्हणाले की, 'वेडे लोकं हे बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेमध्ये असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोणाकडून केला जातो? एनसीबीने त्याचा तपास करायला हवा.' असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

...हे मॅडमला माहिती असायला हवे
राऊत पुढे म्हणाले की, 'आता आपण पाहतोय की चीनने आतमध्ये घुसून आपल्या कानाखाली मारली आहे आणि आता दुसरा गालही आपण पुढे करतोय. काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या केल्या जात आहेत. देशात काय परिस्थिती आहे या मॅडमना माहिती असायला हवे. महात्मा गांधी विश्वाचे नायक होते. बाळासाहेब ठाकरे देखील गांधींच्या विचारांवर अनेकवेळा टीका करायचे. तरीही महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामचे ते नायक होते हे मान्य केलेच पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गांधीजयंतीला राजघाटवर जाऊन गांधीच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात. संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित आहे आहे हे या मॅडमना माहित असायला पाहिजे' असे म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे.

गांधींविषयी काय म्हणाली कंगना?
कंगना रनोटने महात्मा गांधींवर निशाणा साधला होता. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना गांधींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नसल्याचा दावा कंगना केला. तसेच दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असे म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली होती.

बातम्या आणखी आहेत...