आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तार:नारायण राणेंना वरिष्ठ मंत्री करा की पंतप्रधान, शिवसेनेला दुःख वाटण्याचे कारण नाही; शिवसेना खासदार विनायक राऊतांचा राणेंना टोला

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मंत्रिपदावरुन नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना चांगलाचा टोला लगावला आहे. नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा... यामुळे शिवसेनेला दु:ख वाटण्याचे काहीच कारण नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपला राणे यांना मंत्रीपद द्यायचे होते ते त्यांनी ते दिले. त्यामुळे नारायण राणे यांनी आता सुखाने रहावे. त्या पदावर बसून पूर्वीसारखे कोणालाही दुखवण्याचे काम करू नये असा टोलाही विनायक राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?
मोदी सरकारने नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्विकारला. यावेळी शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन मोठे नसल्याची टीका राणे यांनी केली होती. ते पदभार स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या व्यक्तव्यामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...