आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंवर पलटवार:ईडीच्या नावाने एखादा मंत्री धमकी कशी देऊ शकतो? गृहमंत्र्यांची भेट घेऊन संसदेतही मुद्दा मांडणार! शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेवर जोरदार पलटवार केला आहे. दरम्यान, नारायण राणे हे मंत्रिपदाचा गैरवापर करत आहे, आणि किरीट सोमय्यांनी केलेल्या घोटाळ्याचा लवकरच भांडाफोड होईल, असाही दावा राऊत यांनी केला आहे.

ईडीच्या नावाने धमकी देणे केंद्रीय मंत्र्यांना शोभते का? असा प्रश्नही विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना विचारला आहे. राणेंनी सत्तेसाठी लाचारी पत्कारली, असा आरोपदेखील राऊत यांनी केला आहे. नारायण राणेंकडून केंद्रीय मंत्रिपदाचा दुरुपयोग केला जात असल्याचेदेखील विनायक राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांनी देखील नारायण राणे आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...