आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघतेच तुला:'रोशनी शिंदे नंतर आता तुझाच नंबर', ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेची धमकी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना ताजीच आहे. आता ठाकरे गटाच्या आणखी एका महिला पदाधिकाऱ्याला "बघतेच तुला.. रोशनी नंतर आता तुझाच नंबर आहे", अशाप्रकारची धमकी देण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे.

कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राच्या युवतीसेना अध्यक्ष स्मिता आंग्रे यांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी फोन करत धमकावले आहे. मात्र याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी स्मिता आंग्रे यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी थेट पोलिस आयुक्त कार्यालय गाठत आपल्या तक्रारीचे निवेदन दिले.

रोशनी शिंदे प्रकरण काय?

ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे रोशनी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांच्यासोबत झालेल्या या घटनेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: कुटुंबासह ठाण्यात आले. त्यांनी रोशनी यांची भेट घेत विचारपूस केली.

थेट कॉल करत धमकी

स्मिता आंग्रे यांनी शिवसेना गटातील अमित परब यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नम्रपणे विकास दरवळतोय अशी कमेंट केल्यानंतर बुधवारी रात्री 11 वाजता शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी स्मिता आंग्रे यांना फोन करून धमकावले. रोशनी शिंदेची काय हालत झाली बघितली ना तशी तुझी होईल, आता तुझा नंबर आहे. अशी धमकी त्यांना देण्यात आली.

तक्रारीचे निवेदन दिले

यानंतर स्मिता नारायण आंग्रे यांनी गुरुवारी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वरिष्ठांशी बोलावे लागेल असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर स्मिता नारायण आंग्रे यांनी दुपारी पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन आपल्या तक्रारीचे निवेदन दिले आहे.