आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीचा पाहुणचार:ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरी चहा-नाष्ता केला, मुलाला विचारले- तुमचे वडील कंगना आणि अर्णबबद्दल खूपच बोलतात; ईडीच्या छाप्याच्या दुसऱ्या दिवशी प्रताप सरनाईक यांचा दावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला बोलवतील तेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी समर्थ

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरांवरही ईडीने कारवाई केली. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यानंतर प्रताप सरनाईकांनी झालेल्या कारवाईवर भाष्य केले आहे. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरी चहा-नाष्ता केला, तसेच ईडीचे अधिकारी माझ्या मुलांना म्हणाले, तुमचे वडील कंगना आणि अर्णबबद्दल खूपच बोलतात असा दावा सरनाईकांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

...त्या दिवशीच विचार केला होता
प्रताप सरनाईकांनी बोलता म्हटले की, त्यांनी हा दिवस येणारा याचा आधिच विचार केला होता. ते म्हणाले की, 'पण एक आहे ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रनोटवर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने केलेला होता. आम्ही संघर्ष करुन इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केले. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणए आणि भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणे माझी जबाबजारी असल्याचेही सरनाईक म्हणाले.

सरनाईक कुटुंबाने ईडीच्या लोकांचा यथोच्छ पाहुणचार केला
प्रताप सरनाईक म्हणाले की, 'माझ्या आणि मुलांच्या घरी, ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. तसेच चार पाच वेळा चहा देखील घेतला. जेवणही केले. घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसे करायला हवे हे सरनाईक कुटुंबाला चांगले माहिती आहे. माझी पत्नी, मुले आणि सुनांनी त्यांचे चांगले स्वागत केले, तसेच यथोच्छ पाहुणचार केला'

...तर फाशी स्वीकारायलाही तयारी
ईडीच्या लोकांनी सरनाईकांच्या घर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. यावेळी नेमके काय झाले याविषयी बोलताना सरनाईक म्हणाले की, 'ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचे सांगत होते. पण या देशामध्ये, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी केली जात असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणारच. ईडीची धाड पडली म्हणून प्रताप सरनाईकचे तोंड बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरीही मी स्वीकारलायला तयार असल्याचे सरनाईक म्हणाले. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी असल्याचेही सरनाईक म्हणाले.

मला बोलवतील तेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी समर्थ
प्रताप सरनाईक म्हणाले की, 'ईडीच्या लोकांनी माझे कार्यालय आणि घर सगळीकडे चौकशी करत कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मी गेल्या 30 वर्षांपासून हॉटेल आणि बांधकाम व्यवसायामध्ये काम करत आहे. माझ्याकडे सर्व रितसर कागदपत्र आहेत. तसेच ईडीच्या लोकांनी कर्मचारी आणि माझ्या मुलांनाही विचारले आहेत. यावर त्यांचे समाधान झाले नाही तर मला बोलवले जाईल. तेव्हा मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ आहे.'

विहंगल यांना ईडीने विचारले हे प्रश्न
ईडीने सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्यानंतर प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले होते. त्यांची जवळपास पाच तास चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांना कोणते प्रश्न विचाराण्यात आले याची माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे. विहंग यांना व्यवसायासंबंधीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच टॉप्स नावाची एक एजन्सी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मालकाचे आणि आपले काही आर्थिक संबंध, व्यवहार आहेत का? असेही विचारण्यात आले.

टॉप्सचा आणि आमचा संबंध नाही
टॉप्स नावाच्या एजन्सीविषयी बोलताना सरनाईक म्हणाले की, या एजन्सीसोबत आमचा काही संबंध नाही. एक सुरक्षा एजन्सी म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या कार्यक्रमात त्यांचे सुरक्षारक्षक ठेवले जातात. त्याचे रितसर पैसेही दिले आहेत. माहिती विचारली तर देऊ असेही सरनाईक म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser