आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेला संशय:या सर्व शेरलॉक होम्सच्या अवलादींना अश्विनीकुमारांच्या आत्महत्येमागे रहस्य दडलेले असल्याचा सुगावा लागू नये? यामागचे कारण शोधण्यात कुणालाच रस नाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमाचलच्या एका नटीने सुशांत आत्महत्या प्रकरण लावून धरले. पण त्याच नटीच्या हिमाचलमध्ये सी.बी.आय.च्या माजी संचालकांनी आत्महत्या केली यावर कुणी उसासाही सोडू नये?

सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आले. यावरुन भाजपा आय.टी. सेल, त्यांचे पुढारी यांनी सुशांत प्रकरणातील अनेक रहस्ये शोधून धोबीघाटावर आणली. तो रहस्यपट पाहून आफ्रेड हिचकॉक, शेरलॉक होम्स, जेम्स बॉण्डसारखे ‘नायक’ही अचंबित झाले असतील. या सर्व हिचकॉक, शेरलॉक होम्सच्या अवलादींना अश्विनीकुमारांच्या लटकलेल्या देहामागे एखादे रहस्य दडलेले आहे याचा सुगावा लागू नये? शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये. शिमल्याचे पोलीस तपास करतीलच. पण सी.बी.आय.चे नेतृत्व केलेल्या अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येने सी.बी.आय.ने तरी पापण्यांची उघडझाप करावी. आपल्या देशात नक्की काय चालले आहे तेच कळायला मार्ग नाही. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली असे वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला काही लोक तयार नाहीत. हाथरसची तरुणी मरणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते का मेले, हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे! असे शिवसेनेने म्हटले आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

  • सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांनी आत्महत्या केली आहे. देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण बलात्कार, आत्महत्या अशा प्रश्नी गढूळ झाले असतानाच अश्विनीकुमार यांचा मृतदेह त्यांच्या सिमल्यातील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडावा हे धक्कादायक आहे. सी.बी.आय.च्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही.
  • अश्विनीकुमार हे फक्त सी.बी.आय.चेच संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालॅण्ड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. ते हिमाचल राज्याचे पोलीस महासंचालक होते. दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱया एसपीजी गटात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे ते मनाने, शरीराने खंबीर होते व त्यामुळेच त्यांच्यावर सरकारने विशेष जबाबदाऱया सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या ‘नटी’ने भाष्य केले पाहिजे.
  • मुंबईत सुशांतने आत्महत्या केली. त्याआधी काही दिवसांपासून तो निराश होता. अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. वृत्तवाहिन्या, भाजपा आय.टी. सेल, त्यांचे पुढारी यांनी सुशांत प्रकरणातील अनेक रहस्ये शोधून धोबीघाटावर आणली. तो रहस्यपट पाहून आफ्रेड हिचकॉक, शेरलॉक होम्स, जेम्स बॉण्डसारखे ‘नायक’ही अचंबित झाले असतील. या सर्व हिचकॉक, शेरलॉक होम्सच्या अवलादींना अश्विनीकुमारांच्या लटकलेल्या देहामागे एखादे रहस्य दडलेले आहे याचा सुगावा लागू नये?
  • अश्विनीकुमार एक यशस्वी आणि जिंदादिल पोलीस अधिकारी होते. आपल्या सहकाऱयांत ते लोकप्रिय होते. हिमाचलसारख्या छोट्या पहाडी राज्यातून सी.बी.आय.च्या संचालकपदी पोहोचलेले ते बहुधा एकमेव अधिकारी असावेत. सी.बी.आय.चे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक राजकीय गुंता असलेल्या केसेस सोडवल्या. तशी गाजलेली आरुषी तलवार हत्येसारखी प्रकरणेही तपासली. ते एक ‘प्रोफेशनल’ पोलीस अधिकारी होते. निवृत्तीनंतरही ते एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना शिकवत होते व शिमल्यातल्या एका विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करीत होते. ते त्यांचे आवडीचेच काम होते व त्यात त्यांचा वेळ चांगला जात होता. आय.पी.एस. म्हणून त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदे त्यांना मिळाली. मग निराश होऊन गळफास लावून घ्यावा असे त्यांच्या जीवनात काय घडले, यावर प्रकाश पडणे गरजेचे आहे.
  • अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येचे रहस्य यासाठी उलगडायला हवे की, वरिष्ठ पदावर काम करणाऱया अधिकाऱ्यांची मानसिक स्थिती काय आहे? त्यांना कोणत्या दबावाखाली काम करावे लागते? त्यांना असे नैराश्येचे झटके का येतात? त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली असेल तर ते लोक सैन्य किंवा पोलीस दलाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत काय? अश्विनीकुमार हे पोकळ मनाचे गृहस्थ नव्हतेच. त्यांनी राज्यात व केंद्रात चोख सेवा बजावली आहे. नोकरीत असताना तणाव निर्माण होत असतात. अवघड प्रसंगांना सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांनी ही सर्व आव्हाने खंबीरपणे पेलली व आता निवृत्तीच्या काळात त्यांनी निराश होऊन मृत्यूला कवटाळले.
  • मुंबईत सुशांत व शिमल्यात अश्विनीकुमार यांना अशी भ्रांत नव्हती. तरीही त्यांनी मरणाचाच मार्ग स्वतःच स्वीकारला. सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. सुशांत पडद्यावरचा हीरो होता. अश्विनीकुमार हे पोलीस प्रशासनाचे ‘नायक’ होते. हिमाचलच्या एका नटीने सुशांत आत्महत्या प्रकरण लावून धरले. पण त्याच नटीच्या हिमाचलमध्ये सी.बी.आय.च्या माजी संचालकांनी आत्महत्या केली यावर कुणी उसासाही सोडू नये?
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser