आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेची टीका:कंगना प्रकरण म्हणजे देशावरील संकटांवरुन दुर्लक्ष करण्यासाठी पेरलेली 'अफू', नटीच्या बेताल वक्तव्याबाबत संवेदनशील होऊन राजकीय झोडपेगिरी सुरू, शिवसेनेचा भाजपवर घणाघात

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • रिया चक्रवर्तीपासून कंगनापर्यंत सर्व महत्त्वाचे प्रश्न संपले, त्यामुळे राष्ट्राच्या लहानसहान, पोटापाण्याच्या प्रश्नांकडे पहा, इतकीच सरकारला कळकळीची हात जोडून नम्र विनंती!
 • बिहारात निवडणुका जिंकायच्या आहेत. एका विशिष्ट जातीची मते एकगठ्ठा मिळवायची आहेत. म्हणून एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण आणि भांडवल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेना यांच्यातील वादाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. शिवसेनेने कंगना विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरीही भाजपकडून मात्र कंगनाची पाठराखण केली जातेय. शिवसेना आक्रमक झाल्यानंतर भाजपने कंगनाला सुरक्षा पुरवली. तसेच देशावर अनेक संकट ओढावली असताना देशात गेल्या काही दिवसांपासून कंगना प्रकरण आघाडीवर आहे. आता यावरुन शिवसेनेने मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघात केला आहे.

'एका नटीच्या बेताल वक्तव्याबाबत कमालीचा संवेदनशील होऊन मोठा वर्ग एकांगी राजकीय झोडपेगिरी करतो. त्यामागे राजकीय पक्षांचे पाठबळ उभे केले जाते. हे काही राष्ट्रहिताचे राजकारण नाही.' असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र असे असले तरीही कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर शिवसेनाच जास्त संवेदनशील झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावरुन संजय राऊतांनी तिला 'हरामखोर' म्हणूनही संबोधले. मुंबईत येऊनच दाखव अशा धमक्याही तिला शिवसेनेकडून देण्यात आल्या होत्या. तसेच शिवसैनिकांनी तिच्याविरोधात आंदोलनेही केली. कंगनाच्या बेताल वक्तव्यावर शिवसेनाच जास्त संवेदनशील झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान कंगनाने मुंबईत येतेय कुणाच्या बापात दम असेल तर रोखून दाखवा असे आव्हान शिवसेनेला दिले. शिवसेनेचे तिला धमक्या दिल्या यानंतर केंद्र सरकारकडून तिला सुरक्षा दिली. यावरुन भाजप कंगनाची पाठराखण करतेय हे स्पष्ट झाले. यावरुन शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. शिवसेनेने भाजपवर आरोप केलाय की, 'चीनने लडाखच्या सीमेवर 20 जवानांची हत्या केली. तो भयंकर प्रकार राज्यकर्ते क्षणात विसरतात व लोकांनीही ते विसरावे म्हणून वेगवेगळय़ा माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते. त्या अफू सेवनाने तात्पुरती धुंदी येत असेलही, पण प्रश्नांवरची जळमटे काही निघत नाहीत.' असे म्हणत कंगना प्रकरण म्हणजे भाजपने पेरलेली अफू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सामना अग्रलेखात काय?

 • चीनने लडाखच्या सीमेवर 20 जवानांची हत्या केली. तो भयंकर प्रकार राज्यकर्ते क्षणात विसरतात व लोकांनीही ते विसरावे म्हणून वेगवेगळय़ा माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते. त्या अफू सेवनाने तात्पुरती धुंदी येत असेलही, पण प्रश्नांवरची जळमटे काही निघत नाहीत.
 • देशातील तरुणवर्ग त्या धुंदीतून लवकरात लवकर बाहेर पडला तरच काही साधकबाधक सकारात्मक विचार करता येईल. राजकारणासाठी मर्तिकही चालते, पण पोटापाण्याच्या प्रश्नांना स्पर्श करायला कोणी तयार नाही. भारतीय जनता पक्षासाठी सध्या मैदान साफ आहे. त्या मैदानात भुकेकंगाल बेरोजगारांचे थडगे उभारू नका, इतकेच सांगणे आहे.
 • रिया चक्रवर्तीपासून कंगनापर्यंत सर्व महत्त्वाचे प्रश्न संपले आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या लहानसहान, पोटापाण्याच्या प्रश्नांकडे पहा, इतकीच सरकारला कळकळीची हात जोडून नम्र विनंती!
 • राजकारणाची खाज शमली असेल तर राजकारण्यांनी, मीडियाने आता देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही.
 • सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी तपास करून सत्यशोधनास आलेल्या सीबीआयचा तपासही संपत नाही, पण रिया चक्रवर्तीस अमली पदार्थांच्या एका प्रकरणात मात्र अटक झाली आहे.
 • ठरविल्याप्रमाणे कंगना राणावतही मुंबईस आल्या व मुंबई पोलिसांच्याच कडेकोट बंदोबस्तात स्वगृही पोहोचल्या. त्यामुळे आता राष्ट्रहिताच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या, जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नांवर सगळय़ांनीच लक्ष द्यायला हवे.
 • चीन तिकडे हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषेवर संघर्ष सुरू आहे. चीनने लक्ष्मणरेषेचा भंग केला तर मुंहतोड कारवाई करण्याचे आदेश आपल्या कमांडर्सना देण्यात आले आहेत. चीन आमच्या हद्दीत घुसला आहे व इंचभरही मागे हटायला तयार नाही. हे लक्ष्मणरेषा तोडण्याचेच प्रयत्न नाहीत काय? मग आता आणखी कोणती लक्ष्मणरेषा तोडण्याची वाट आपण पाहत आहोत.
 • बिहारात निवडणुका जिंकायच्या आहेत. एका विशिष्ट जातीची मते एकगठ्ठा मिळवायची आहेत. म्हणून एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण आणि भांडवल कसे केले गेले, ते सगळय़ांनीच अनुभवले. त्याबाबत राष्ट्रीय आणि राजकीय धोरणे ठरविली जातात, पण लाखो-करोडो लोक बेरोजगार, गरीब झाले त्यावर मात्र धोरण ठरत नाही.
 • एका नटीच्या बेताल वक्तव्याबाबत कमालीचा संवेदनशील होऊन मोठा वर्ग एकांगी राजकीय झोडपेगिरी करतो. त्यामागे राजकीय पक्षांचे पाठबळ उभे केले जाते. हे काही राष्ट्रहिताचे राजकारण नाही.
 • चीनने लडाखच्या सीमेवर 20 जवानांची हत्या केली. तो भयंकर प्रकार राज्यकर्ते क्षणात विसरतात व लोकांनीही ते विसरावे म्हणून वेगवेगळय़ा माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते. त्या अफू सेवनाने तात्पुरती धुंदी येत असेलही, पण प्रश्नांवरची जळमटे काही निघत नाहीत.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser