आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा:मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना सर्वच 'पांडव' खाली मान घालून बसले होते, सामनामधून शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय एकात्मतेचे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? असा सवाल करत शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले दिसत आहे. राज्य सरकार कंगनावर अन्याय करत असल्याची टीकाही अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान कंगनाने महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले. यावरुन आता शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्र्ाहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्र्ाहरण सुरू असताना घडलेले दिसत होते.' असे शिवसेनेने म्हटले आहे.

'शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? असा सवाल विरोधकांना विचारला आहे.

तसेच 'जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये. असे म्हणत शिवसेनेने विरोधकांना थेट सुनावले आहे.

सामना अग्रलेखात काय?

  • महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवले आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच. मुंबई महाराष्ट्राचीच आहे व राहणार, असे घटनाकार डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले.
  • डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान! डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रद्वेष्टय़ा मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा 106 हुतात्म्यांचा अवमान करणाऱया विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते.

  • बॉलीवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा ‘तंबू’ मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. या सिनेसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसानेच घातला. त्या वृक्षाची गोड फळे आज मुंबईत सर्वच भाषिक कलाकार खात आहेत. मुंबईच्या सिनेसृष्टीत, संगीतात नशीब अजमावयास येणारे आधी फुटपाथवर पथारी पसरतात. पण नशिबाचा तारा एकदा चमकला की, याच मुंबईच्या जुहू, मलबार हिल, पाली हिल भागात आपले इमले उभे करतात. पण एक नक्की, हे सगळे लोक सदैव मुंबई-महाराष्ट्राशी कृतज्ञच राहिले. मुंबईच्या मातीशी त्यांनी कधी बेइमानी केली नाही. दादासाहेब फाळक्यांना कधी ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले नाही. पण फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ‘भारतरत्न’च काय तर ‘निशाने पाकिस्तान’पर्यंतचे किताब मिळाले.

  • मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असा हा प्रकार आहे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुंबईची भूमी येथील भूमिपुत्रांच्या रक्ताने आणि घामाने भिजली आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत.