आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेकडून जयांचे कौतुक:सिनेसृष्टीचे 'गटार' झाले असे बोलणाऱ्यांमागे सत्ताधाऱ्यांच्या 'झांजा'; म्हणून त्यांना चिपळ्या वाजवाव्या लागतात, जया बच्चन यांच्या विधानाला शिवसेनेचे समर्थन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे ‘गटार’ही नाही

ड्रग्स प्रकरणावरून संपूर्ण चित्रपटसृष्टीवरच आरोप करणाऱ्या काही कलाकारांवर खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेमधून जोरदार टीका केली होती. आता जया बच्चन यांना शिवसेनेने जोरदार पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जया बच्चन यांना पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच भारतीय सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे ‘गटार’ही नाही असही शिवसेनेने म्हटलं आहे.

सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केला आहे. हॉलीवूडच्या बरोबरीने तुमच्या बॉलीवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत, तसे नीरव मोदी, मल्ल्या आहेत. सिनेसृष्टीच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली. त्यातून किती कलावंतांना कंठ फुटतो ते पाहू. असे म्हणत शिवसेनेने जया बच्चन यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

सामना अग्रलेखात काय?

  • हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. श्रीमती जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे.
  • ‘‘ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्यशी सहमत नाही.’’ श्रीमती जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱया लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.
  • श्रीमती बच्चन या सत्य आणि परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपली राजकीय, सामाजिक मते कधीच लपवून ठेवलेली नाहीत. महिलांवरील अत्याचारांबाबत त्यांनी संसदेत अत्यंत भावुक होऊन आवाज उठवला आहे.
  • सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी श्रीमती बच्चन यांची बिजली कडाडली आहे.
  • सिनेसृष्टीतील यच्चयावत सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ हे जणू ‘ड्रग्ज’च्या जाळय़ात अडकले आहेत, चोवीस तास गांजा, चिलमीचे झुरके मारीत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱयांची ‘डोपिंग’ टेस्ट व्हायला हवी. कारण यापैकी बहुतेकांच्या बाबतीत खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदुस्थानी सिनेसृष्टीस एक परंपरा आणि इतिहास आहे. ही मायानगरी असेलही, पण या मायानगरीत जसे ‘मायावी’ लोक आले आणि गेले तसे अनेक संतसज्जनही होतेच.