आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे संजय राठोड सर्वांसमोर, पोहरादेवीच्या दर्शनासाठी दाखल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इमारतीवरुन उडी मारुन पुजाने केली होती आत्महत्या

टीकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात राज्यातील मंत्र्याचे नाव आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले होते. या प्रकरणात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे गेले अनेक दिवस नॉट रिचेबल होते. आज अखेर ते सर्वांसमोर अवतरले आहेत. शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. आता ते समर्थकांशी बोलणार आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये दोन व्यक्ती एका मुलीविषयी बोलताना दिसत होत्या. यामधील एक जण हे शिवसेना मंत्री संजय राठोड असल्याचा आरोप केला जात होता. भाजपने थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान गेल्या 15 दिवसांपासून संजय राठोड सार्वजनिक ठिकाणी आले नव्हते. दरम्यान ते आज सर्वांसमोर येणार आहेत. ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

इमारतीवरुन उडी मारुन पुजाने केली होती आत्महत्या
परळी येथे राहणारी 22 वर्षांची पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी पुण्यात इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावण्यासाठी आली होती. ती आपल्या भावासोबत पुण्याच्या वानवडी परिसरात राहत होती. रविवारी अर्ध्या रात्री पूजाने पुण्याच्या हॅवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दरम्यान तिच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. ज्यानंतर तिची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या आत्महत्येचा संबंध महाविकास आघाडीतील एका मंत्र्यासोबत जोडला जात होता.

बातम्या आणखी आहेत...