आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जमिनीच्या वापरावरुन उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला फटकारले आहे. दरम्यान निर्णय दुर्दैवी असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त व्यक्त केले. तसेच विरोधी पक्षाने हा विषय राजकीय केलेला आहे, त्यात न्यायालयाने पडू नये असे म्हणत राऊत संतापले आहे.
'विरोधी पक्षाने विषय राजकीय केलेला आहे, त्यात न्यायालयाने पडू नये आणि हेच योग्य आहे. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचे आहे. हे मीठागरवाले कुठून आले? असा सवालही राऊतांनी केला. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू
'कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधले जाणार नाही. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरे बांधणार होते. मग आता ही जमीन सरकारची नाही का? असा सवालही राऊतांनी केला. पुढे ते म्हणाले की, अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करण्याचे काम सध्या सुरू आहे. अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
देशाच्या न्यायव्यलस्थेला असे कधीच पाहिले नाही
राऊतांनी न्यायालयावर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'न्यायालय सध्या कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरच्या न्यायालयाकडून जामीन दिला जातो. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवले जाते. देशाच्या न्यायव्यलस्थेला आम्ही असे कधी पाहिले नव्हते. ' असे म्हणत राऊतांनी न्यायालयावरही टीका केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.