आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेवर जाणार? संजय राऊत म्हणतात - 'त्यांचा निर्णय मुख्यमंत्री घेतील'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उर्मिला मातोंडकरने काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे नाव चर्चेत आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी देण्यात येईल या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या विषयावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, 'उर्मिला मातोंडकरांचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. कॅबिनेटचा हा निर्णय आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील'. दरम्यान खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली असल्याचीही माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे म्हणत याविषयावर जास्त भाष्य केलेले नाही.

उर्मिला मातोंडकरने काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाचा पराभव केला होता. यानंतर उर्मिलाने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर उर्मिला शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्याचीही माहिती आहे.