आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी तयार करण्यासाठीच्या चर्चेसाठी त्यांचा हा दौरा आहे. दरम्यान मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ' योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहे, साधु आहेत, योगी आहेत ते. मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ते बसले आहेत त्यांच्यासोबत अक्षय कुमार देखील बसला असल्याचे मी पाहिले. कदाचित अक्षय कुमार आंब्याची टोपली घेऊन गेले असतील' असे म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
...हा तर विनोद आहे
'मुंबईतील फिल्म सिटी कोणी इकडून नेण्याची गोष्ट करत असेल तर तो विनोद आहे. हे काही सोपं नाही, याचा खूप मोठा इतिहास आहे. आम्हा सर्वांचे रस्त आणि घाम याच वाहिला आहे. योगी आदित्यनाथांना मी एढेच विचारू इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करू इच्छित असाल तर करा. परंतु नोएडामध्ये जी फिल्म सिटी तयार केलेली त्याची आज काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी किती चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते? हे पण जरा मुंबईत येऊन त्यांनी सांगा' असा सवाल राऊतांनी योगींना केला आहे.
#WATCH | मैंने देखा कि योगी जी मुंबई में किसी 5 स्टार होटल में अक्षय कुमार के साथ बैठे हैं शायद अक्षय जी आम की टोकरी लेकर गए होंगे। मुंबई की फिल्म सिटी को कोई यहां से ले जाने की बात अगर करता है तो पहले योगी जी ये बताएं कि नोएडा फिल्म सिटी की अभी क्या हालत है?: संजय राउत, शिवसेना pic.twitter.com/yVvXDsVMK3
— ANI_HindiNews (@AHindinews) December 2, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.