आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. फडणवीसांनी दिलेला फोन टॅपिंगचा अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका निघाला त्याला वातही नव्हती, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
सरकार अडचणीत येईल असे त्या अहवालात काहीही नाही
संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, 'दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असलाच पाहिजे आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचे स्वागतच झाले पाहिजे. ते काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले असे वृत्त पाहिले. पण तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवले. त्या अहवालात काडीचाही दम नाही. त्या अहवाल सादर केल्यानंतर सरकारला अडचणीत आणेल असेत्यात काहीही नाही.' असे राऊत म्हणाले.
त्या फटाक्याला वात देखील नव्हती
पुढे संजय राऊत म्हणाले की, 'विरोधी पक्ष नेते जो बॉम्ब घेऊन आले होते. तो बॉम्प नसून एक भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वात देखील नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का याकडे लक्ष दऊन होतो. पण तसे काहीच दिसले नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत 'खेला होबे' सुरू आहे. यामुळे राज्यातील जनतेचे मनोरंजन सुरू आहे. विशेष म्हणजे याला कोणताही मनोरंजन टॅक्स भरण्याचीही गरज नाही' असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
फडणवीसांनी घेतली होती गृहसचिवांची भेट
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीमध्ये फडणवीस यांनी गृह सचिवांना फोन टॅपिंग संदर्भात 6.3 जीबीचा कॉल रेकॉर्डींग डाटा एका बंद पाकिटात सादर केला होता. आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील रॅकेटची काही कागदपत्रेही यामध्ये देण्यात आली आहेत. यानंतर महाविकास आघाडीसरकार हे फोन टॅपिंग अहवालामुळे अडचणीत सापडल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र हा अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका आहे. यामुळे सरकार अडचणीत येणार नाही असे राऊत म्हणाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.