आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा टोला:'आनंद महिंद्रांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध केला, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटण्याचा आनंद साजरा केला होता'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांंवर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार?

शिवसेना नेते संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती तसेच राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच विरोधकांनाही सुनावले आहे. यासोबतच उद्योगपती आनंद महिंद्रांनाही देखील टोला लगावला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. महिंद्रा यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी भाष्य केले. 'आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळय़ा पिटण्याचा आनंदही साजरा केला होता'असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही
कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात लोकांना थाळय़ा व टाळय़ा पिटायला लावले. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळय़ा पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही. पहिल्या लॉकडाऊनला वर्ष झाले. 24 मार्च 2020 च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते.

विरोधासाठी विरोध केला
मुंबईसारख्या शहरातले कोविड सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. श्रीमंतांच्या खासगी रुग्णालयांतही जागा नाही. असे अभूतपूर्व संकट आज महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात कोविडचा कहर आहे, पण महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्दैव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, ‘हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा.’ तेव्हा त्यांच्यावर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार? विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी व राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही. राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे, असे विरोधी पक्षाने पुढे येऊन सांगायला हवे होते. त्यात सगळय़ांचेच हित झाले असते.

बातम्या आणखी आहेत...