आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकून राजकीय स्फोट घडवला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण हे पूर्णपणे ढवळून निघाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले असल्याचा गंभीर आरोप सिंहांनी केला आहे. यानंतर थेट राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. हे राजकीय वादळ सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेल्या एका ट्विटमध्ये राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत हे राजकीय वातावरण तापलेले असताना त्यावर जास्त प्रतिक्रिया न देता ट्विटच्या माध्यमातून आपले मत मांडत असतात. यामध्येही ते शायरीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. राज्यातील वातावरण हे ढवळून निघालेले असताना आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असताना राऊतांनी एक शायरी पोस्ट केले आहे. 'हमको तो तलाश बस नए रास्तों की है ..हम हैं मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' संजय राऊत यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. या ट्विटमधून राऊत यांना नेमके काय म्हणायचे? या ट्विटमधून राऊत काय संकेत देत आहेत. या ट्विटला अनुसरुन काही नवीन घडामोडी पुढे राजकारणात घडणार आहेत का असे अनेक अंदाज सध्या बांधले जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.