आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

के. चंद्रशेखर आणि ठाकरेंच्या भेटीवरुन वाक् युद्ध:'कोण आहे सोमय्या? देशात असे *## लोक फार आहेत', संजय राऊत संतापले

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. फोनवरील चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले होते. के. चंद्रशेखर राव यांनी निमंत्रण स्वीकारले आहे आणि आज मुंबईत त्यांची भेट होणार आहे. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

राऊतांनी केला अपशब्दांचा वापर
किरीट सोमय्यांनी सवाल केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना अपशब्दांचा वापर केला. ते म्हणाले की, 'कोण आहे किरीट सोमय्या? देशात असे चु*## लोक फार आहेत. देशातील अशा प्रत्येक #** लोकांना शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणे मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण 2024 नंतर अशा *## लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशामध्ये राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असणार आहे. 10 मार्चनंतर तुम्हाला कळेल.' असे राऊत म्हणाले आहेत.

नव्या समीकरणांची पायाभरणी
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहेत. असे असताना भाजपच्या लोकांनी अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, मराठी लोकांचा अपमान आहे. यामुळे मी मी त्यांना *## म्हणालो आहे. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देते हादेखील अपमान आहे' असे राऊत म्हणाले. तसेच 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची पायाभरणी होईल. या भेटीमध्ये देशाच्या आगामी वाटचालीची दिशा निश्चित करण्यात येईल. मात्र, भाजपचे काही नेते उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीची खिल्ली उडवत आहेत.' असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
या भेटीविषयी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. ते म्हणाले होते की, 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेण्यापूर्वी सोनिया गांधींची परवानगी घेतली आहे का? असा सवाल केला होता.

बातम्या आणखी आहेत...