आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अनेक घोषणा केल्या आहेत. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहे. दरम्यान यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांसाठी देखील काही घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत. यासोबतच महिला आणि विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये उल्लेख आहे. आता या मोदी सरकारच्या बजेटवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मोदी सरकारचे बजेट हे नेहमी प्रमाणेच आभासी आणि फसवे आहे. त्यांच्या या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी नेहमीप्रमाणे काहीच नाही. गरीबांचा किती गळा आवळणार आणि देशातील दोनचार श्रीमंतांना आणखी किती श्रीमंत होतात हे पुढच्या काळात पाहू.' असे संजय राऊतांनी म्हटले आहे.'
सीतारमन यांच्या घोषणा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.