आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांची प्रतिक्रिया:राजकीय नेत्यांची नावं येतील की घुसवली जातील हा एक प्रश्न आहे, राज्यात सुरु असलेल्या छापेमारीवर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मुंबईमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात येत आहेत. या छापेमारीचा एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाष्य केले आहे.

या सुरु असलेल्या छापेमारीविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असेल आणि काही गंभीर विषय असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे गरजेचे आहे. आता जी काही तुम्ही नावं घेत आहेत, दाऊद यांच्या सारखी. तर त्यावर आपण जास्त बोलायला नको. जर त्यासंदर्भात काही कारवाई सुरू असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्रित काम केले पाहिजे'.

या प्रकरणामध्ये काही राज्यातील एका मंत्र्याचे येणार असल्याची माहिती माहिती आहे. याविषयी प्रश्न विचारला असताना संजय राऊत म्हणाले की, 'मला माहिती नाही. नावं हे समोर येतील की नावं घुसवली जातील. हा एक पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात, झारखंडमधील प्रश्न आहे. मात्र त्यावर मी जास्त बोलणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा फार गंभीर आणि नाजूक विषय असतो त्यावर तपास सुरू असताना फार बोलणं योग्य नाही असंही संजय राऊत म्हणाले.'

1980 च्या दशकामध्ये दाऊद इब्राहिमने भारतसोडून परदेशात पळ काढला होता. आता तो परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करत असल्याचा संशय ईडीला आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती देखील समोर आली होती. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान ईडीने दाऊदची बहीण हसीन पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापेमारी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...