आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊत संतापले:आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका! प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर अन्याय का?  गिफ्ट सिटीबाबत मोठ्या घोषणांनंतर राऊतांचा संताप

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी गुजरातच्या गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटीसाठी मोठी घोषणा करण्यात आली. यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याविषयावरुन आता आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये असलेले शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यावरुन भाजपवर संतापले आहेत. आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका! अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपला सुनावले आहे.

याविषयावरुन संजय राऊत म्हणाले की, 'मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून त्यांना पाहावत नाही. भाजपच्य मुंबईतील नेत्यांची यावरील भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे झाले नाही त्यापेक्षा जास्त ताकदीने मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या राज्याचा विकास होत असेल तर आमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. प्रत्येक राज्याचा विकास झाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. तेव्हाच देशाचा विकास होईल. मात्र असे करण्यासाठी मुंबईचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे. असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'मुंबई देशाला 2.5 लाख कोटी रुपये देत आहे. सर्वाधिक कर मुंबईमधून केंद्र सरकारला जातो. मात्र केंद्र सरकार मुंबईबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. आमच्याच पैशांवर बाजीरावगिरी करू नका. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर अन्याय का केला जातो. शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई हिसकावण्याचा प्रयत्न केला जातोय.' असे देखील संजय राऊत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे मुंबईएवजी आता गुजरातमधील गांधीनगरमध्ये (गिफ्ट सिटी) सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र सक्षम व्हावे यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. यामुळे गेल्या पाच वर्षात मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीसोबत स्पर्धा करावी लागेल. यावरुन संजय राऊतांनी संताप व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...