आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल:सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल, तेव्हा काय करायचे ते पाहू; संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून एफआयआर दाखल केला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे. सीबीआय आपले काम करतेय. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचे ते पाहू असे राऊत म्हणाले.

सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची 11 तास चौकशी केली होती. यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, 'सीबीआयचा एक अजेंडा आहे. यासोबतच न्यायालयाचा आदेश आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. अनिल देशमुखांनी आपली बाजू सीबीआयकडे मांडली आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचे ते बघू असे राऊत म्हणाले. तसेच सीबीआयने आपले काम केले, न्यायालयानेही आपले काम केले. आता महाविकास आघाडी आपले काम करत आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी पोलीस बंदोबस्तात वाढ
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनिल देशमुख हे सध्या नागपुरातच मुक्कामी आहेत. माजी पोलिस आयुक्त परमविर सिंह यांच्या आरोपांवर चौकशी करणार्‍या सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यातील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपुरातील निवासस्थानी सीबीआयचे पथक पोहोचले की नाही याबाबत अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...