आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंत जाधवांच्या घरावर छापेमारी:पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, 2024 पर्यंत आम्हाला सहन करावं लागेल; संजय राऊतांचा टोला

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली आहे. हा शिवसेनेला एक मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान आता या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'महिन्याभरात महापालिका निवडणुका होणार आहेत, प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे महापालिकेच्या शिपायांवरही धाडी टाकल्या जातील, कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात.' असा टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच 2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय असंही राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, 'महापालिका निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरामध्ये सुरु होणार आहे. उद्या महापालिकेच्या शिपायांवरही छापे टाकण्यात येतील. महापालिकेतील काही शिपाई हे धनुष्यबाण लावतात. मराठी असल्यामुळे ते लावतात. शिवसेनेवर त्यांचे प्रेम आहेत. तदरम्यान आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 2024 पर्यंत आम्हाला हे सहन करावे लागणार आहे. महाराष्ट्राला सहन करायचे आहे. पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करायचे आहे' असे राऊत म्हणाले.

दरम्यान, इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी करत आहेत. सध्या त्यांच्या घरात असणारी कागदपत्रे तपासली जात आहेत. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे याची माहिती अद्यापत मिळू शकलेली नाही. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपकडून जाधवांवर करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...