आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया:विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? याचा अभ्यास करणे महत्त्वाचे; सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ उडाली. दरम्यान आता या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी 'विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधायला हवे' असे म्हटले आहे.

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. असे असतांना माध्यमांकडून संजय राऊतांना या पत्राविषयी प्रश्न केला. यावेळी त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, पत्रात विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. हा गंभीर आरोप आहे. त्याचा सर्वांनी अभ्यास करावा असे संजय राऊत म्हणाले आहेत.

या पत्राविषयी जास्त बोलणे टाळत संजय राऊत म्हणाले की, एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यावे असे काय आहे. हे पत्र खरे असेल तर यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जातो असे लिहिल्याचे मी माध्यमांमध्येच पाहिले. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतेय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा अभ्यास करणे गरजेचेआहे, असं राऊत म्हणाले.

प्रताप सरनाईकांनी पत्रात काय लिहिले?
आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन पानी पत्रं लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. या पत्रात त्यांनी म्हटले की, तुम्ही राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याच सरकारमधील काही मंत्री केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत असल्याचा आरोपी त्यांनी यात केला.

ते पुढे म्हणतात की, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आप्पलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

बातम्या आणखी आहेत...