आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या निर्णयावर मला शंका:सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा; सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वांनाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचे आदर होईल का? याबाबत मला आज तरी शंका आहे. संविधान आणि संसदेने ही दक्षता घेतली की, निवडणूक आयोग कुठेली तडजोड करणार नाही. परंतु निवडणूक आयोगाने स्वत:च्याच अधिकाराखाली निवडणूक चिन्ह ऑर्डर 1968 काढली, त्यामध्ये सेक्शन 15 प्रमाणे एखाद्या पक्षामध्ये निवडणूक चिन्हाच्या अधिकाराबाबत हस्तक्षेप करता येतो, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

सुप्रीम कोर्टात मंगळवारी घटनापीठासमोर शिवसेना कुणाची यावर सुनावणी पार पडली. त्यात निवडणूक चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. कोर्टाने दिलेला हा निर्णय शिंदे गटाला दिलासा असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आता आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निर्णयाचा फेरविचार करावा

आंबेडकर म्हणाले की, पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाला सेक्शन 15 ऑर्डर ही संविधानीक आहे की नाही? याची तपासणी करण्याची संधी मिळाली होती. परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही. आतापर्यंत संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता ठेवली होती. या निर्णयामुळे त्यात तडजोड झाल्याचे दिसत आहे. यापुढे पक्षाचे चिन्ह हे निवडणूक आयोग ठरवेल असा जो संदेश गेलेला आहे तो चुकीचा असल्याचे मी समजतो. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा.

ठाकरे गटाला झटका

शिवसेना पक्ष, चिन्ह यावर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटाची लढाई आता निवडणूक आयोगासमोर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली. या वेळी ठाकरे गट, शिंदे गट, निवडणूक आयोग, राज्यपाल यांच्या वकिलांनी 5 तास युक्तिवाद केला. सर्व बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळत निवडणूक आयोगाला कार्यवाहीस मुभा दिली. हा ठाकरे गटाला झटका तर शिंदे गटाला दिलासा मानला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...