आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पावसाळ्यातील ४ महिने बंद ठेवावे लागणार आहे, अशी माहिती सल्लागार कंपनीने उघड केली आहे. आजपर्यंत ही बाब तत्कालीन फडणवीस सरकारने गुप्त ठेवली होती. चार महिने स्मारक बंद न ठेवण्याबाबतच्या उपायांची चाचपणी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
फडणवीस सरकारच्या काळात शिवस्मारकाची पायाभरणी झाली होती. तसेच स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले होते. मात्र ३६०० कोटी खर्चून बांधले जाणारे स्मारक पावसाळ्यातील चार महिने समुद्र सुरक्षित नसल्याने बंद ठेवावे लागणार असल्याचे उघड करण्यात आले नव्हते.
स्मारकासंदर्भात आढावा बैठकीत प्रकल्प सल्लागार कंपनी इंजिज इंडियाने स्मारकाची वस्तुस्थिती मांडली. दिवसाला स्मारकाला २५ हजार प्रवासी भेट देतील. मात्र स्मारक वर्षातील ४ महिने बंद ठेवावे लागेल. त्यावर मंत्री अशोक चव्हाण यांनी पर्याय विचारला. तेव्हा रोपवे, सागरी सेतू किंवा भुयारी मेट्रो पर्याय असल्याचे सांगितले. त्यातील भुयारी मेट्रो पर्याय व्यवहार्य असून त्यासाठी अधिकचा १५०० कोटी खर्च वाढणार असल्याची बाब सल्लागार कंपनीने निदर्शनास आणली.
शिवस्मारकाचे एक टोक जमिनीवर, दुसरे समुद्रात
- समुद्राखालून रेल्वेचे अनेक प्रकल्प झालेले आहेत, पण शिवस्मारकाचे एक टोक जमिनीवर तर दुसरे टोक समुद्रात आहे. तसेच सध्याचा स्मारकाचा आराखडा आहे, त्यात भुयारी रेल्वेचे नियोजन नाही.
-पर्यावरणाच्या अनुषंगाने स्मारकाचा वाद न्यायालयांमध्ये असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास स्मारकाचे काम थांबलेले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.