आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माची आई तिचा मानसिक छळ करीत होती. पैशांसाठी सतत छळत होती. चंदीगडचे अंकल संजीव कौशलचे नाव ऐकले तरी तुनीषाला कापरे भरायचे, असे आरोप करून तिला हिजाब घालण्याची बळजबरी केली नाही, असा दावा टीव्ही अभिनेता शिझान खानच्या कुटुंबीयांनी केला आहे.
“अलिबाबा : दास्तान-ए-काबुल’ची नायिका तुनीषाने २४ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा सहनायक शिझान खान अटकेत असून शिझानच्या कुटुंबीयांनी तुनीषाला हिजाब घालण्यास भाग पाडले होते तसेच धर्मांतरासाठी बळजबरी केल्याचा आरोप तिची आई वनिता शर्मा व तिचा माजी व्यवस्थापक पवन शर्मा यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिझानच्या दोन बहिणी अभिनेत्री फलक नाझ, शफाक नाझ आणि त्याच्या आईने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. शिवाय तिची आई, चंदीगडचे अंकल संजीव कौशल आणि पवन शर्मा यांच्यावर शिझानच्या कुटंुबीयांनी छळाचे आरोप केले. ४ जानेवारी रोजी तुनीषाच्या वाढदिवशी तिला सरप्राइज देण्याचा आमचा विचार होता. ती आम्हाला धाकट्या बहिणीसारखी होती. तिचा हिजाब घातलेला फोटो शूटिंगसाठी काढलेला होता. आम्ही तिला कधीच हिजाब घालण्याची बळजबरी केली नाही, असे फलक नाझ म्हणाली.
अंकलचे नाव ऐकताच तुनीषाला भरायचे कापरे
शिझानची बहीण व फलक नाझ, अभिनेत्री शफाक नाझ आणि आईने पत्रकार परिषद घेऊन तुनीषाच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप खोडून काढले.
पैशांचे हिशेब आईच पाहायची
तुनीषाच्या पैशांचा हिशेब तिची आईच पाहत असे. अनेकदा ती आईला पैसे मागायची. आईने वाढदिवशी तिचा मोबाइल फोडला होता. तिचे अंकल संजीव कौशलचे नाव ऐकले ती थरथरायची, असा दावा शिझानच्या बहिणींनी केला.
जामिनासाठी अर्ज
न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिझान खानने सोमवारी पालघर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर ७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
तुनिषाच्या आईने २ व्हिडिओ केले होते साइन
शिझान हिची बहीण म्हणाली, “आत्महत्येआधी तुनिषा आणि माझे बोलणे झाले होते. आवाजावरून ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुटी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुटी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला विनंती करण्यास मला सांगितले होते. प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुटी मिळत नव्हती. तुनिषाच्या आईने जबरदस्तीने दोन म्युझिक व्हिडिओ साइन केले होते. मी तिचे तिकीट बुक केले होते. तिच्या सुटीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते, असेही तिने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.