आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लॉकडाउन-5:राज्य सरकारकडून लॉकडाउन-5 बाबत नवीन नियमावली जाहीर; शॉपिंग मॉल, हॉटेल्स, धार्मिक स्थळे अद्याप बंदच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार

मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाउन होता. यात अनेक गोष्टींवर निर्बंध होते. पण, आता केंद्र सरकारने काल अनलॉकच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काल लॉकडाउन-5 किंवा अनलॉक-1 बाबत नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार 8 जूनपासून धार्मिकस्थळे, हॉटेल्स, मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यातच आज महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउन-5 बाबत आपली नियमावली जारी केली. यात केंद्राने सवलती दिलेल्या काही गोष्टींवर राज्यात अद्याप बंदी कामय राहणार आहे.

राज्यातील सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार, येत्या 3 जूनपासून राज्यात काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी जनजीनव सुरू करण्यात येईल. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खासगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असेल. केवळ इनडोर स्टेडिअममध्ये परवानगी नाही. तसेच, अद्याप सामुहिक अॅक्टिविटीजना परवानगी दिलेली नाही. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार आणि काय बंद राहणार?

 • 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक.
 • कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार.
 • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी.
 • सार्वजनिक मैदानेही खुली होणार.
 • समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी.
 • धार्मिक स्थळे बंदच राहणार.
 • स्डेडिअम बंदच राहणार.
 • फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश.
 • लांबच्या प्रवासावर बंदी.
 • शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार.
 • मेट्रो बंदच राहणार.
 • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.
 • सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल, बंद राहतील.
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील.
 • शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्तरॉ बंदच राहतील.
 • सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.
 • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
0