आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Show Cause Notice To 5 Teachers After Coming To School Wearing Jeans In Palghar, Action Will Be Taken If They Do Not Reply Within Two Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या नियमांमध्ये अडकले:पालघरमध्ये जीन्स घालून शाळेत आल्यानंतर 5 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस जारी, दोन दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास होणार कारवाई

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात शिक्षकांना शालीन व सभ्य कपड्यांमध्ये शाळेत येण्यास सांगितले आहे.

पालघरमद्ये एक प्रकरणामध्ये 5 टीचर्सला जीन्स घालून शाळेत आल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विक्रम गढ तहसीलच्या सरकारी शाळेतील ही घटना आहे. ही नोटीस शिक्षण विभागद्वारे जारी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात शिक्षकांना शालीन व सभ्य कपड्यांमध्ये शाळेत येण्यास सांगितले आहे. नोटीसनुसार 2 दिवसांच्या आत या शिक्षकांना त्यांची उत्तरे घेऊन कार्यालयात हजर व्हावे लागेल. वेळीच उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही केली जाईल. नोटीसमध्ये विचारण्यात आले आहे की, शासनाद्वारे हा आदेश जारी करण्यात आला आहे. तरीही त्यानंतरही आदेशाचे पालन का केले जात नाहीये?

सरकारच्या या जीआरवर झाली टीका
शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कोणत्या प्रकारचे परिधान असावे या संदर्भात महाराष्ट्र सरकारने परिपत्रक जारी केले आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा सरकारने हा नियम लागू केला होता. त्यावेळी त्यांच्यावर कठोर टीका देखील झाली होती.

हा ड्रेसविषयी सरकारचे नवीन नियम

 • शिक्षकांनी गडद, ​​रंगीबेरंगी नक्षीदार कपडे घालू नयेत.
 • कार्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शाळेत शिक्षकांनी जीन्स टी-शर्ट घालू नये.
 • कर्मचारी, अधिका्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावे.
 • महिलांनी साड्या, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राउजर घालावे.

शूजसाठी नियम

 • तसेच सरकारी कार्यालयांमध्ये स्लीपर घालण्याची परवानगी नाही.
 • महिला कर्मचार्‍यांनी चप्पल, सँडल, शूज घालावेत.
 • पुरुष कर्मचाऱ्याने फॉर्मल शूज किंवा चप्पल घालावे.
 • ऑफिस किंवा शाळेत स्लीपर्सचा वापर करु नये.
बातम्या आणखी आहेत...