आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरेंना फोन करून गर्दी दाखवा, म्हणजे ठाकरेंना खरी कुठली शिवसेना आहे ते तुम्हाला कळेल, असे म्हणत शिंदे गटातील शहाजीबापू पाटील यांनी ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली आहे. शिवसेना कुणाची आहे, हे आता जनतेला समजले असेल, असे ही शहाजीबापू यांनी म्हटले आहे. तर भगव्याची शान शिंदेंनी राखली म्हणून जनता त्यांच्या पाठी आहे, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
देवेंद्र फडणवीसांच्या पाठित जो उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला तो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ते जनता विसरली नाहीये, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगबावला आहे. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर नेहमी टीका केली त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले हे चुकले नाही का. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचे दोन वर्षांपूर्वीच एक घाव दोन तुकडे केले असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
शिंदेंची गद्दारी नाही
मेलेल्या कुत्र्यासारखे सर्व आमदारांना एकडून तिकडे उकरड्यावर टाकत होते. तुम्हाला रक्ताने वारसदार म्हणून बोलण्याचा अधिकार आहे, आणि आम्ही आजही तुमचा आदर करतो असे म्हणतांनाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तळागाळातील शिवसैनिकांनी आवाज उठवला होता, म्हणून सर्व जण शिंदेंच्या सोबत आहे. म्हणून हे सर्व जण एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत.
उद्धव ठाकरेंवर साधले शरसंधान
महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण ही एकनाथ शिंदेना आहे, मंत्रिमंडळात आधी हे सर्व सहकारीहोते पण मुख्यमंत्री जे गायब झाला तो दिसलाच नाही, असे म्हणताना मातोश्रीच्या कुबड्यात स्वत:ला कोंडून घेतले असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंनी गुवाहटीवरून आणलेले इजेन्शन दिल्याने ठाकरे पिता-पूत्र महाराष्ट्रभर फिरत आहे, अशी खरपूस टीका शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.