आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:'श्रद्धाच्या हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे केले', कोर्टाने आफताब पूनावालावर निश्चित केले आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या साकेत कोर्टाने श्रद्धा वालकर हत्येचा दोषी आफताब पूनावाला याच्यावर IPC कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे गायब करणे) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. आफताबने हे आरोप स्वीकारण्यास नकार देत न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 जून रोजी होणार आहे.

दिल्लीच्या साकेत कोर्टाने मंगळवारी 9 मे रोजी श्रद्धा वालकर खून प्रकरणात आफताब पूनावाला यांच्याविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप निश्चित केले. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आरोपी आफताब अमीन पूनावालाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

18 मे 2022 रोजी दिल्लीत आरोपी आफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीच्या जंगलात फेकून देण्यात आला होता.

या संबंधित बातमी वाचा...

पापा मी 25 वर्षांची, स्वतःचे निर्णय घेऊ शकते:श्रद्धा स्वतःचे घर सोडून निघून गेली होती; वडील म्हणाले - तेव्हा ऐकले असते तर आज जिवंत असती

26 वर्षीय मुलीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले. ही अंगावर शहारे आणणारी कहाणी आहे. पण त्यात सर्वात दुखद पैलू श्रद्धाच्या वडिलांचा आहे. प्रेमात पडलेल्या आपल्या मुलीने आपले ऐकले असते, तर कदाचित आज ती जिवंत असती, अशी हुरहूर त्यांना वाटत आहे. पूर्ण बातमी वाचा...