आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य ठाकरे यांनी रामराज्यावर बोलू नये, आधी रामायण वाचावे असा टोला शिवसेना खासदार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. तसेच ज्यांनी सत्तेसाठी स्वतःचे कुटुंब तोडले, आपल्या भावाला घराबाहेर काढले त्यांनीही रामराज्यावर बोलू नये असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर केला.
श्रीकांत शिंदे म्हणाले, जे टीका करत आहेत त्यांनी आधी रामायण वाचावे. रामराज्य कोण चालवत होते आणि रावणराज्य कोण चालवत आहे हे जनतेला माहित आहे. गेली अडिच वर्षे तुम्ही रावणराज्य चालवले, असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला अयोध्येतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
वाल्मिकीचे रामायण वाचावे
श्रीकांत शिंदे म्हणाले, ज्यांना हनुमान चालिसा वाचायची होती त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले, कंगना राणावतचे घर तोडले, पालघर साधु हत्याकांडाच्या आरोपींना तुम्ही शोधू शकले नाही, बॉम्स्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंध असणाऱ्या जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही घेऊ शकला नाहीत, हे रामराज्य आहे का? महाराष्ट्राच दुर्भाग्य याच्यापेक्षा अधिक काय असणार. आणि हे आम्हाला रामराज्य कोणते आणि रावणराज्य कोणते हे शिकवत आहेत, यांनी एकदा वाल्मिकीचे रामायण वाचावे.
सत्तेसाठी चिटकून राहिले
श्रीकांत शिंदे म्हणाले, कुठेतरी डायलॉगबाजी केली की प्राण जाये पर वचन न जाये, तर वचन कोणी तोडले? प्रभु श्रीराम वनवासात जायला सांगितले तेव्हा ते निघून गेले. सत्तेसाठी ते चिटकून राहिले नाही. यांनी आपल्या भावाला घराबाहेर पडले. कोण आहे यांच्या कुटुंबात. आम्ही येथे राजकारण करायला आलेलो नाही. दर्शन करायला आलेलो आहोत.
संबंधित वृत्त
हिंदुत्वाचा हुंकार:शिंदे, फडणवीस अयोध्येत दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहोचताच शासकीय प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.