आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:नैतिकतेची खुमखुमी असेल, तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी राजीनामा द्यावा; खासदार श्रीकांत शिंदे यांचे आव्हान

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एवढी नैतिकता-नैतिकता म्हणत आहात. तुम्हाला नैतिकतेची इतकी चाड आणि खुमखुमी असेल, तर ठाकरे गटाच्या चौदा-पंधरा आमदारांनी राजीनामा द्यावा. निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. ते मुंबईत बोलत होते.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला श्रीकांत शिंदे, संजय शिरसाट, उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

लोकांची दिशाभूल सुरू

श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाकरे गट लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. कोर्टाने फक्त दोन प्रकरणांवर टिपण्णी केली. चार प्रकरण फेटाळले. मला वाटते यांना निवडणुकीची खूप घाई झालेली आहे. यांना नैतिकतेची एवढी खुमखुमी असेल, तर भाजप-शिवसेनेच्या मतावर निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या चौदा-पंधरा आमदारांनी अगोदर राजीनामा द्यावा. निवडणुकीला पुढे जावे. तुम्हाला कोण थांबवत आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

खूप जण संपर्कात

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे खूप लोक आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच. ते आजच सांगितले, तर येणारे सरप्राइज कसले, असे हसत-हसत एका प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

मिठाला जागणे म्हणजे...

संजय शिरसाट म्हणाले की, ज्याच्याकडून घेतले, त्याच्या मिठाला जागणे, यालाच नैतिकता म्हणतात. तुमच्यामध्ये नैतिकता असती, तर आमचा सावंत नावाचा सहकारी बांद्र्यात कॅन्सरने मेला. तुमच्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर तो हॉस्पिटलमध्ये होता. तुम्ही कितीदा त्यांना जाऊन भेटलात. तुम्ही यामिनी जाधव यांना भेटायला किती वेळा गेलात, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित वृत्तः

सोडले की अटक केले कळतच नाही:सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा, राज ठाकेरेंचे निरीक्षण; मुख्यमंत्र्यांना जपून राहण्याचा सल्ला

निवडणूक आयोग ब्रह्मदेव नाही:राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले, नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

एक घाव दोन तुकडे:मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; शिंदे-फडणवीसांनाही दिले आव्हान

शिंदे सरकारवरचे संकट टळले:ठाकरेंचा राजीनामा आत्मघात ठरला; वाचा सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे आणि नोंदवलेली निरीक्षणे

40 आमदारांचे बंड ते आजचा खंडपीठाचा निकाल, वाचा राज्यातील सत्तासंघर्षात केव्हा काय व कसे घडले

CJI चंद्रचूड चर्चेत:महाराष्ट्र-दिल्लीच्या सत्तासंघर्षावर ऐतिहासिक निकाल, वडीलही होते सरन्यायाधीश, जाणून घ्या कारकीर्द