आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लसीकरण:5 आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांच्या लसीकरणासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून 9 कोटी 40 लाख रुपयांची मदत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे अभियान गडचिरौली, नंदुरबार, नाशिक, अमरावती आणि पालघरसारख्या आदिवासी भागात राबवण्यात आले
  • या लसीकरण मोहिमेअंतर्गत 1 लाख 40 हजार 287 मुलांना न्यूमोनियाविरोधी खुराकदेखील दिली जाईल

राज्यातील पाच आदिवासी जिल्ह्यातील मुलांच्या न्यूमोनियाच्या लसीकरण अभियानासाठी सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्टने 9 कोटी 62 लाख 32 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हे अभियान राज्यातील गडचिरौली, नंदुरबार, नाशिक, अमरावती आणि पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यात राबवले जाईल.

1  लाख 40 हजार 287 मुलांचे लसीकरण

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेतंर्गत 1 लाख 40 हजार 287 मुलांना न्यूमोनियाविरोधी खुराकदेखील दिली जाईल. प्रत्येक डोसमागे दोनशे रुपये खर्च केले जातील. या मोहिमेतून विशेषकरुन न्यूमोनियामुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूला थांबवले जाईळ. गडचिरौली आणइ इतर आदिवासी भागात न्यूमोनियामुळे अनेक मुलांचा जीव गेला आहे. पण, आता लसीकरणामुळे बालमृत्यू रोखण्यात मोठे यश आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी सिद्धीविनायक ट्रस्टकडे मदत मागितली होती

लसीकरण मोहिमेसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक आणि आयुक्तानी सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडे आर्थिक सहाय्यतेसाठी पत्र लिहीले होते. लसीकरणासाठी 9 कोटी 62 लाख 32 हजार रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. याला मंदिराच्या ट्रस्टने मंजूर केले. 

0