आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ शुक्लाचे निधन:झोपण्यापूर्वी सिद्धार्थने खाल्ली होती काही औषधे; घरात रात्री मित्रासोबत होता, त्याच मित्राने पोलिसांना दिली माहिती

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थ हे टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नाव होते

अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थने मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे. मात्र, आतापर्यंत कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. सिद्धार्थची बहीण आणि त्याचा मेहुणा दोघेही रुग्णालयात उपस्थित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्ला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपायच्या आधी काही औषध घेतले होते, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. त्याने कोणते औषध घेतले होते हे स्पष्ट झालेले नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची रुग्णालयाने नंतर पुष्टी केली.

सिद्धार्थ एका मित्रासोबत घरी होता
सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो एका मित्रासोबत घरी होता. मित्राने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत पलंगावर पडलेला होता. यानंतर त्याने प्रथम पोलिसांना माहिती दिली आणि नंतर तो त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. रुग्णालयातही त्याच्या शरीरात हालचाल नव्हती आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थचे शवविच्छेदन काही वेळात केले जाईल.

रुग्णालयात आणण्यापूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता
रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याला सकाळी 9.25 वाजता रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीनंतर तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे हे समजले जाऊ शकते की शुक्लाचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा नव्हत्या. शुक्लाच्या शवविच्छेदनासाठी रुग्णालयाने एक विशेष पॅनल तयार केले आहे. गेल्या 24 तासांदरम्यान सिद्धार्थच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

सिद्धार्थ हे टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नाव होते
सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री शॉकमध्ये आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट दिसत आहेत. अलीकडेच तो शहनाज गिलसोबत 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसला होता. सिद्धार्थ शुक्लाने 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छूटे ना' या टीव्ही शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर, तो 'जाने पहन से अजनबी', 'सीआयडी', 'बालिका वधू' आणि 'लव्ह यू जिंदगी' सारख्या टीव्ही शो आणि अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसला. सिद्धार्थ शुक्लाने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटातही काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...