आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:11 वी सीईटी लटकण्याची चिन्हे, 4 ऑगस्टला होणार सुनावणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे यंदा दहावीचे विद्यार्थी गुणांनी मालामाल झाले असले तरी मंुबई हायकोर्टातील जनहित याचिकेने ११वीची सीईटी लटकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश लांबतील व सीईटीला इतर मंडळाचे प्रश्न टाकल्यास काय करायचे, असा प्रश्न राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसमोर आहे.

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यंदा दहावीचा निकाल लागला. परिणामी, आजपर्यंत अवघ्या ६ महापालिका क्षेत्रात होणारी ११ वी प्रवेशाची सीईटी यंदा राज्यभर लागू झाली आहे. २१ ऑगस्टला सीईटी असून १० लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे पालक मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. सीईटीमध्ये इतर बोर्डाच्या अभ्यासक्रमाचे प्रश्न समाविष्ट करण्याची त्यांनी मागणी केली आहे. ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी असून राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करायची आहे.

राज्य मंडळाचे १६ लाख तर केंद्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळाचे अवघे ११ हजार विद्यार्थी राज्यात ११ वीला प्रवेश घेतात. त्यामुळे ऐनवेळी केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या प्रश्नात बदल केल्यास राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका राज्य सरकार न्यायालयात मांडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...