आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी:निदान सिंधुदुर्ग किल्ला तरी शिवाजी महाराजांचाच आहे, नाही तर कोणीतरी म्हणेल की, मीच बांधला; उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही

चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळा शुक्रवारी सिंधुदुर्गात पार पडला. या कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी या दोघांमध्ये शाब्दीत वार होणार ही अपेक्षा होती आणि तसेच झाले. दोघांची शाब्दीक चकमक येथे पाहायला मिळाली. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केली. तर मुख्यमंत्र्यांनीही भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या सर्व टिका टिप्पण्यांचे त्यांनी सडेतोड उत्तर दिले. भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी नारायण राणेंवर टोलेबाजी करण्यास सुरुवात केली. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, हा क्षण आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीमध्ये आंब्याची झाडे उगवतात तसे बाभळीचे झाड देखील उगवत असते. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कार्यक्रमाला काळा तीट लावणारीही देखील येथे लोकं आहेत

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक पाठांतर करुन बोलत असतात, मात्र अनुभवाने बोलणे वेगळे असते. कळकळीने बोलणे वेगळे असते आणि मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळे असते. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून यासाठी आपण काळ तीट लावत असतो. असंच काही लोकांनी नजर लागू नये म्हणून कार्यक्रमाला काळा तीट लावलं आहे. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजाचाच...

आजही मी अभिमानाने सांगतो की, आजच्या या विमानतळाच्या लोकार्पणानंतर अधिक जणांना याचा लाभ होणार आहे. अनेक लोक विकासाच्या गोष्टी बोलून गेले, तेच मी आता बोलणार नाही. तसेच आपल्या फोटोग्राफीविषयी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.

बातम्या आणखी आहेत...