आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sindhudurg Is One Of The 30 Most Beautiful International Tourist Destinations In The World, With A Total Of 9 Destinations In India | Marathi News |

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात सुंदर आंतरराष्ट्रीय 30 पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश, भारतातील एकूण 9 ठिकाणे

रायगड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा कुठे भेट द्यावी, प्रतिष्ठित मॅगझिन कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली यादी

जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटनस्थळांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या पर्यटन विषयाला वाहिलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मॅगझिनने ही यादी जाहीर केली असून त्यात भारतातील एकूण ९ पर्यटनस्थळांचा समावेश केला आहे. त्यात सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यटनस्थळ आहे.

जगभरात कोरोनाची लाट ओसरत असल्याने या वर्षी पर्यटनस्थळांवर गर्दी होत आहे. त्यामुळे कोंड नेस्ट ट्रॅव्हलरच्या यादीस महत्त्व आहे. या यादीमध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सिक्कीम, मेघालय, ओडिशा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भीमताल, केरळमधील आयमानम अशी भारतीय ९ पर्यटनस्थळे समाविष्ट आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आल्याचे दिसून येते. यासंदर्भात सर्वात सुंदर ३० पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

पर्यटनास चालना देणारे मॅगझिन : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर इंडिया हे एक मॅगझिन तसेच वेबसाइट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटनस्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटनस्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

...म्हणून सिंधुदुर्गची निवड : स्वच्छ-सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड यासारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच स्कूबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाच्या दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे पर्यटन सोपे झाले असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...