आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्ष निवडणूक:कोकणात राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की

सिंधुदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी मुंबईत भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे कोकणात भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. कुडाळमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

कुडाळमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीवरुन भाजप आणि शिवसेना कार्येकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीपासून काही अंतरावर पोलिसांनी रोखले. त्याचवेळी शिवसेने आमदार वैभक नाईक आणि शिवसेनेचे काही नगरसेवक गाडीने त्या ठिकाणी गेले. यावरुन भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची सुरु असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यस्थी करत तणाव मिटवला. सध्या या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून दंगल नियंत्रण पथक देखील बोलावण्यात आले आहे.

रस्त्याच्या एका बाजूला शिवसेना कार्यकर्ते आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने धक्काबुक्की झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आले आहेत. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून, राणे यांना पुन्हा धक्का देण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांची ओळख परेड केली. दुसरीकडे कुडाळ शहरात काँग्रेसमय वातावरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेसने पक्षाचे झेंडे लावले असून, जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे.

कुडाळ नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या 9 नगरसेवकांनी आज, कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कणकवली येथून कुडाळकडे रवाना झाले.

कुडाळ नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसकडे

सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच, अवघ्या एका जागेने ही नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसच्या ताब्यात गेली. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. आज नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, ती भाजप आणि काँग्रेस-शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...