आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे:खंडणी प्रकरणात एसआयटी करणार परमबीर यांची चौकशी, बिल्डरच्या तक्रारीनंतर ठाणे पाेलिसांनी दाखल केला होता गुन्हा

ठाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि इतर २६ जणांविरुद्ध कथित खंडणी वसुलीच्या प्रकरणात तपासासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

बिल्डर केतन तन्ना यांच्या तक्रारीवरून ठाणेनगर ठाण्यात गेल्या आठवड्यात सिंग व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये इतर आरोपींत पोलिस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलिस आयुक्त एन.टी. कदम, माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा, पोलिस इन्स्पेक्टर राजकुमार कोथमिरे, कैदेतील गँगस्टर रवी पुजारी आणि एका पत्रकाराचेही नाव आहे. तन्नानुसार, सिंह जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान ठाणे पोलिस आयुक्त असताना आपल्याकडून १.२५ कोटींची खंडणी उकळली होती. सिंग यांच्याविरुद्ध आधीच एका खंडणी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अँटिलिया प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याने त्यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवले होते.

बातम्या आणखी आहेत...