आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्कायमेटकडून 2023 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 94 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस 858.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला आहे. शेतकरी कोलमडून पडला आहे.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अलनिनोचा प्रभाव भारतीय मान्सुनवर होऊ शकतो. देशातील अनेक भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखीन भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवामान विभागही वर्तवेल अंदाज
या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज देणार आहे. त्याशिवाय भारतीय हवामान विभाग आपला अंदाज 15 एप्रिलला वर्तवेल. त्यानंतरच पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत थोडा अंदाज येईल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाचा एक अंदाज येतो, त्यानंतर यावर्षीच्या पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत नेमकी याबाबत माहिती समोर येईल.
अल निनो
अल निनोशिवाय मान्सूनवर परिणाम करणारे इतरही घटक आहेत. हिंद महासागर द्विध्रुव (IOD) मध्ये मान्सून मध्यम करण्याची क्षमता आहे आणि जर तो पुरेसा असेल तर अल निनोचे दुष्परिणाम नाकारू शकतात. स्कायमेटनुसार देशाच्या उत्तर आणि मध्य भागांना पावसाच्या कमतरतेचा धोका असल्याची अपेक्षा आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस
गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. उत्तर भारतातील कृषी क्षेत्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटविषयी
स्कायमेट वेदर ही भारतातील सर्वात मोठी हवामान अंदाज आणि कृषी जोखीम उपाय कंपनी आहे. स्कायमेट वेदर ही भारतातील एकमेव खाजगी हवामान अंदाज एजन्सी 2003 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि तेव्हापासून सातत्याने विश्वसनीय आणि अचूक हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी ओळखली जाते.
जूनमधील सरासरी पाऊस
• सामान्य पावसाची 70% शक्यता. • सामान्यपेक्षा जास्त पावसाची 10% शक्यता. • सामान्यपेक्षा कमी पावसाची 20% शक्यता.
जुलैमधील सरासरी पाऊस
• सामान्य पावसाची 50% शक्यता • सामान्यपेक्षा जास्त पावसाची 20% शक्यता • सामान्यपेक्षा कमी पावसाची 30% शक्यता
ऑगस्टमधील सरासरी पाऊस
• सामान्य पावसाची 20% शक्यता • सामान्यपेक्षा जास्त पावसाची 20% शक्यता • सामान्यपेक्षा कमी पावसाची 60% शक्यता
सप्टेंबरमधील सरासरी पाऊस
• सामान्य पावसाची 20% शक्यता • सामान्यपेक्षा जास्त पावसाची 10% शक्यता • सामान्यपेक्षा कमी पावसाची 70% शक्यता
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.