आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजना प्रमुख शहरांसाठी लागू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णय

सर्वसामान्य गरीब माणसाचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई महानगर वगळता उर्वरित एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका व नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.