आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड भूस्खलन:आतापर्यंत 44 मृतदेह काढले बाहेर, आणखी 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींवर उपचार सुरु आहेत - जिल्हाधिकारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहे. राज्यात आतापर्यंत पावसामुळे 136 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहाणी झाली आहे.

एनडीआरएफच्या पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 44 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर ढिगाऱ्याखाली अजून 50 जण अडकल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

जखमींवर उपचार सुरु आहेत - जिल्हाधिकारी
रायगड जिल्ह्यात सहा ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन ठिकाणाहून 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर सदरील घटनेत 35 जण गंभीर जखमी झाले असून त्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितली आहे.

बातम्या आणखी आहेत...