आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना प्रवेश:मृदा व जलसंधारण मंत्री आणि अपक्ष आमदार शंकर गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीत जाऊन हातात शिवबंधन त्यांनी बांधले. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता.

आज दुपारी शंकरराव गडाख यांनी मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर हातात शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांचीही उपस्थिती होती.

नगरमध्ये शिवसेना आणखी मजबूत
शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशाने आता नगरमध्ये शिवसेना आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते. यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते.

बातम्या आणखी आहेत...