आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातल्या सर्व शहरात घनकचरा संकलनासाठी 'आयसीटी' आधारित प्रकल्प राबवणार. रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला मंत्रिमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.
शंभर टक्के अर्थसहाय्य
घनकचरा संकलनासाठी राज्यातल्या सर्व शहरात 'आयसीटी' आधारित प्रकल्प राबविण्यावरही शिक्कमोर्तब करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने व्हावीत म्हणून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला.
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी २५ मुला-मुलींना ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.