आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या-फाईल प्रकरण:सरकारी कार्यालय कोणाच्या बापाच्या मालकीचे नसते, सोमय्यांना नोटीस पाठवल्याने फडणवीस संतापले; उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुनही भडकले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राज्य सरकारने नोटीस पाठवल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत. सरकारी कार्यालय हे कोणाच्या बापाच्या मालकीचे नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

सरकारने किरीट सोमय्या यांना कोणत्या अधिकारात नोटीस पाठवली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मी बापाच्या मालकीचा हा शब्द जाणीवपूर्व वापरत असल्याचेही त्यांनी म्हटले.

टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही- फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांनी मालाड येथील उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे नाव महापालिकेने मैदानाला देणे अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्याचा महिमा करण्याचे काम केले जाते आहे. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला आहे तो रद्द केला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...