आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वस्थता:नांगरे यांच्यावर सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुळे पोलिस दलात अस्वस्थता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी ‘माफियागिरी’ नव्हे

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले होते

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील राजकीय नेत्यांप्रमाणे आता मुंबई पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुरू केलेल्या आरोपांमुळे पोलिस दलात अस्वस्थतेचे वातावरण आहे. कोल्हापूर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाची अंमलबजावणी करणे हे पाेलिसांचे कर्तव्य होते. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या अशा पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष्य करून किरीट सोमय्या यांनी माफियागिरीचा आरोप केल्याने पोलिस दलांत संताप आणि अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, १०० काेटींच्या कथित वसुली प्रकरणाशी विश्वास नांगरे पाटील यांचा संबंध नाही.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या मुलूंड येथील घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्याला आक्षेप घेत सोमय्यांनी मुंबई पोलिस सहआयुक्त नांगरे पाटील यांनी आपल्याला घरात बेकादेशीर डांबून ठेवल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले होते. गेल्या १९ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी सीएसटी स्टेशनवर आलेले सोमय्या यांना पोलिसांनी रोखले. त्यांना प्रतिबंध करणाऱ्या पोलिसांशी सोमय्या यांनी हुज्जत घातली होती. यानंतर मुंबईचे पोलिस सहआयुक्त नांगरे पाटील हे राज्य सरकारचे माफिया असल्याप्रमाणे वागत आहेत, असा आरोप साेमय्या यांनी केला होता.

वास्तविक मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात एका ज्येष्ठ मंत्र्याने १०० कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असा उल्लेख केला होता. तसेच अँटिलिया स्फोटके प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे यानेही राज्य सरकारमधील एका मंत्र्याने १०० कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असा मुद्दा एनआयएच्या कोर्टात मांडण्याचा प्रयत्न केला होता.

मुळात कथित वसुलीचे हे प्रकरण मुंबई पेालिसांच्या क्राइम ब्रँचशी संबंधित आहे. नांगरे पाटील हे मुंबई सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आहेत. त्यामुळे वसुलीच्या प्रकरणाशी नांगरे पाटील यांचा दुरान्वयेसुद्धा संबंध येत नसल्याचे स्पष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...