आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचे पिता-पुत्रांवर आरोप:पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्यांचे संबंध, निल सोमय्या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर; दोघांनाही अटक करा - संजय राऊत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर बॉम्ब गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. तर त्यांचा मुलगा या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. असा आरोप राऊतांनी केला आहे.

याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, निल सोमय्या पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यानेच निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. या सर्वांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादाने जर यावर अॅक्शन घेतली तर त्यावर कारवाई होऊ शकते. मी आदित्य ठाकरेंना आवाहन आवाहन करतो की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा. यासोबतच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ईडीवाले तुम्ही ऐका. सीबीआयवाल्यांनी देखील ऐकावे. हा जो किरीट समोय्या आहे. तो एक फ्रॉड आहे. त्याने बँक घोटाळा केलेला आहे. तसेच लोकांचे पैसे देखील बुडवले आहेत. आता निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची आणि नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...