आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल परब पुन्हा भाजपच्या रडारवर:रिसॉर्ट पाडण्यासाठी प्रक्रिया सुरू; पुढील महिन्याभरात रिसॉर्ट कारवाई होईल - सोमय्या

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराचे स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या हातात हा हातोडा दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना खेडमध्ये दिली. सीआरझेंड झोनमध्ये केवळ अनिल परब यांनी बांधकाम केले बाकी कुणी केली नाही, महाराष्ट्र सरकारने रिसॉर्ट पाडण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. आणि पुढील महिन्याभरात रिसॉर्ट पाडले जाईल असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. भाजपचे नेते करीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. साई रिसॉर्टप्रकरणी सोमय्या आज पुन्हा दापोली दौऱ्यावर आहेत. त्यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचेही यावेळी सांगितले. रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू कधी होणार ती होणार नसेल तर आम्ही पाडू असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

नार्वेकरांनंतर परबांचा नंबर

अनिल परबांच्या बेकायदा रिसॉर्ट प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी केंद्राच्या तज्ज्ञ समितीने रिसॉर्टवर कारवाई करून तोडण्याची शिफारस केली होती. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडणार, असे ट्टविट सोमय्यांनी केले होते.

राज्य सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना ​​​​आदेश

राज्य सरकारने अनिल परब यांच्या कथित मालकीचे असलेले रत्नागिरीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते. अखेर 25 ऑगस्टरोजी राज्य सरकारने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटीच्या अध्यक्षांना हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले. याबाबतही किरीट सोमय्या यांनीही ट्विट करुनच माहिती दिली होती.

शिंदे-भाजप सरकार येताच आदेश

अनिल परब यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करत याच पैशांतून परबांनी दापोलीतील रिसॉर्ट खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच, या रिसॉर्टच्या बांधकामात पर्यावरण नियमांचेही उल्लंघन झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. मविआ सरकार असताना त्यांनी या प्रकरणाची थेट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. केंद्रानेही तातडीने याची दखल घेत चौकशी करत कारवाईचे आदेश दिले होते. आता राज्यात शिंदे-भाजप सरकार येताच राज्य सरकारने हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...