आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NCB ची मोठी कारवाई:मुंबईचा सर्वात मोठा ड्रग डीलर 'बटाटा'च्या मुलाला केली अटक, एकेकाळी रस्त्यावर बटाटे विकायचा पिता फारुख

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फारुखचा मोठा मुलगाही मोठा ड्रग्स सप्लायर

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) रात्री उशिरा मोठ्या कारवाईत मुंबईतील मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाबला अटक केली आहे. रात्री उशिरा मुंबईत तीन ठिकाणी NCB ने छापा टाकला. शादाबकडून 2 कोटी किंमतीची ड्रग्ज, एक लक्झरी कार आणि एक कॅश काउंटिंग मशीन जप्त करण्यात आली आहे.

तपासात समोर आले आहे की, फारुख आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात बटाटे विकायचा. नंतर तो अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला. आता तो मुंबईचा सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर आहे. बटाट्याचा व्यवसाय करत असल्यामुळे त्याचे नाव 'बटाटा' असे झाले.

सुशांत प्रकरणातही आले होते नाव
मुंबईमध्ये MDMA व्यतिरिक्त विदेशामधून येणारी ड्रग जसे LSD, गांजा, बड, कोकीनचा सर्वात मोठा सप्लायर फारुखच आहे. अशा वेळी त्याच्या मुलाला अटक झाल्याने ही NCB साठी मोठी कामगिरी मानली जात आहे. NCB नुसार मुंबईच्या प्रत्येक मोठ्या ड्रग्स पार्टीजमध्ये तो ड्रग्स सप्लाय करतो. अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्स अँगल केस ( केस नंबर 16/20) मध्येही त्याचे नाव आले होते.

बॉलिवूडमध्ये ड्रग्स सप्लाय करायचा शादाब
मिळालेल्या माहितीनुसार, NCB ने काल बुधवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड परिसरात छापेमारी केली आणि शादाबला अटक केली. NCB ला त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात MD ड्रग्स मिळाल्या आहेत. याची बाजारात 2 कोटी एवढी किंमत आहे. आज शादाबला NDPS कोर्टमध्ये हजर केले जाईल. शादाब बटाटा ड्रग्सच्या व्यवसासायत दिर्घकाळापासून होता आणि मुंबईच्या सेलिब्रिटीजला ड्रग्स सप्लाय करण्याचे काम करत होता.

फारुखचा मोठा मुलगाही मोठा ड्रग्स सप्लायर
तपासात समोर आले आहे की, फारुखचा दुसरा मुलगा सैफ देखील ड्रग्सच्या धंद्यामध्ये आहे आणि मोठ्या-मोठ्या गाड्यांमधून सेलिब्रिटिजला ड्रग्स सप्लाय करायला जातो. NCB यावर लवकरच कारवाई करु शकते. तपासात समोर आले आहे की, सैफ जवळ अनेक लग्जरी गाड्या आहेत आणि तो याच गाड्यांनी बॉलिवूड सेलेब्रिटीजला ड्रग्स सप्लाय करायचा.

7 फेब्रुवारीला चिंकू पठानला झाली होती अटक
एका दिवसांपूर्वी NCB ने ड्रग पेडलर्सच्या विरोधात मुंबईच्या अंधेरी आणि डोंगरी परिसरात छापेमारी केली होती. यापूर्वी सात फेब्रुवारी, 2021 लाही अंधेरी आणि डोंगरी परिसरात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने छापेमारी केली होती. छापेमारी दरम्यान फरार माफिया दाऊद इब्राहिमचा गुंड परवेझ खान उर्फ ​​चिंकू पठाण याला अटक करण्यात यश मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...